सिंहावलोकन– वेतनधार्यांसाठी गृह कर्ज

भूतकाळात कधी तुम्हाला गृह कर्ज मिळण्यात अडचणीचा सामना करावा लागला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला कर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असेल, तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही येथे उपलब्ध आहोत. योग्य मदत घेतल्याने गृह कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सोपी आणि लाभदायक अनुभव देणारी होऊ शकते. आम्ही ICICI HFCमध्ये छोट्या किंवा मोठ्या संघटीत संस्थांमध्ये काम करणाऱ्या वेतनधारी व्यावसायिकांचे स्वागत करतो, मग त्या मालकी, भागीदारी, LLP, खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय (एनएनसी) कंपन्या असो.

आमचे गृह कर्ज तुम्हाला लक्षात घेऊनच तयार करण्यात आले आहे. आम्ही सोपे पात्रता निकष प्रदान करतो आणि त्यासाठी अगदी मोजक्या व मुलभूत कागदपत्रांची आवश्यकता आहे. आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या प्रत्येक शाखेमध्ये कायदेशीर व तांत्रिक अशा तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे जो तुमच्या अर्जाचे जागच्या जागी पुनरावलोकन करू शकते, त्यामुळे तुम्हाला 72 तासांच्या आत गृह कर्ज मिळू शकते.

तुम्ही व तुमच्या स्वताच्या घराच्या स्वप्नांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. तुम्हाला कर्जाचे वितरण झाल्यानंतर – परतफेडीच्या वेळी किंवा भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या निधीची आवश्यकता असेल तेव्हा सुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी येथे उपलब्ध आहोत.

वेतनधार्यांसाठी आपले घर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व लाभ

परवडण्याजोगे गृहनिर्माण फायदे

ICICI HFCचे परवडण्याजोगे आपले घर हे उत्पादन तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) गृह कर्जावर रु. 2.67 लाखांच्या अनुदानाचा लाभ प्रदान करते. आपले घर ही योजना इतर कोणत्याही गृह कर्जापेक्षा वेगळी आहे आणि ही योजना वेतानधारी व गैरवेतनधारी अशा दोन्ही स्वरूपाच्या व्यक्तींसाठी आहे, जरी ते औपचारिक उत्पन्नाच्या पुराव्याची व्यवस्था करू शकले नाही तरीही.

सर्व महत्वाकांक्षी घरमालकांसाठी कर्ज

आमचे गृह कर्ज हे वेतनधरी व्यक्ती जसे शासकीय कर्मचारी आणि कॉर्पोरेट व्यावसायिक तसेच स्वयंरोजगारी व्यक्ती जसे डॉक्टर्स, वकील, सीए, व्यापारी किंवा छोटे व्यावसाय मालक या दोन्हींसाठी उपयुक्त आहे. आम्ही तुमचे स्वतःचे घर असावे या तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी वचनबद्ध आहोत.

सोपे पात्रता निकष

लवचिक पात्रता निकषांमुळे आणि मुलभूत दस्तऐवजांच्या आवश्यकतेमुळे आपले घर सोबत गृह कर्ज घेणे अधिक सहज सोपे झाले आहे. जरी तुमच्याकडे आयकरासारखा औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसेल, परंतु कर्ज परतफेडीचा तुमचा इतिहास चांगला असेल तरी आमचे स्थानिक तज्ञ तुम्हाला आवश्यक ती मदत करतील.

सूचना: तुमची पात्रता वाढविण्यासाठी, तुम्ही तुमच्यासोबत एक सह-अर्जदार किंवा महत्वाचा कुटुंबातील सदस्य देखील जोडू शकता

त्वरित कर्ज वितरण

तुम्ही 72 तासांपेक्षा कमी वेळेत गृह कर्ज मिळवू शकता. आमच्याकडे आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि जागच्या जागी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे, जेणेकरून कागदपत्रांसाठी अनेक विनंत्या व भेटी द्याव्या लागणार नाहीत.

रु. 3 लाख पासून ते रु. 5 कोटी पर्यंत गृह कर्ज

तुम्हाला लहान किंवा मोठे कर्ज हवे असेल, आम्ही त्या सर्वांना वित्तपुरवठा करू. तुम्ही खालील सर्व बाबींसाठी गृह कर्ज मिळवू शकता:

 • बांधकाम-अंतर्गत मालमत्ता, ताब्यासाठी तयार असलेली मालमत्ता किंवा बिल्डर मालमत्ता
 • नवीन मालमत्ता किंवा पुनर्विक्री मालमत्ता
 • डीडीए व म्हाडासारखी राज्य गृहनिर्माण मंडले किंवा विद्यमान सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट मालक संघटना, खासगी विकासकांच्या विकास प्राधिकरणे सेटलमेंट्स किंवा घरे यांसारख्या मालमत्ता
 • शहरातील मालमत्ता, नियमित वसाहती आणि ग्रामपंचायतीच्या मालमत्तांसाठी
 • मल्टी-युनिट किंवा स्वयंनिर्मित मालमत्तांसाठी किंवा तुमच्या मालकीच्या जमिनीवरील किंवा प्लॉटवरील बांधकामासाठी किंवा पुनर्वित्त अशा निवासी मालमत्तेसाठी सुद्धा गृह कर्ज मिळवू शकता.
 • फ्रीहोल्ड/लीजहोल्ड प्लॉटवर बांधकामासाठी किंवा विकास प्राधिकरणाने दिलेल्या प्लॉटवर बांधकामासाठी

ICICI HFCकडे स्थानांतरीत करा

यापूर्वीच तुम्ही 2-3 वर्षांपासून वार्षिक 11% व्याजदराने गृह कर्जाची परतफेड करीत आहात. जर तुमचे गृह कर्जाचे व्याज हे आमच्यापेक्षा किमान 50 बेसिस पॉईंटने जास्त असेल, तर तुमचे ईएमआयचे ओझे कमी करण्यासाठी आमच्या बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेसह ICICI HFCमध्ये स्थानांतरीत व्हा, स्पर्धात्मक व्याजदराचा आनंद घ्या आणि आमच्या तज्ञांचे अविभाजित लक्ष प्राप्त करा.

पात्रता – वेतनधर्यांसाठी गृह कर्जाची

वेतनधरी व्यक्ती

 • राष्ट्रीयता

भारतीय, भारतातील रहिवासी व अनिवासी भारतीय (एनआरआय)

 • वय (प्राथमिक अर्जदार)

भारतीय राहिवाश्यांसाठी 23 ते 60 वर्षे आणि अनिवासी भारतीयांसाठी 25 ते 60 वर्षे

 • पात्र जॉब प्रोफाईल

मालकी, भागीदारी, एलएलपी किंवा खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करणारे लोक,

 • सह-स्वामित्व संपत्ती

तुमच्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असतील तर अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व सह-मालक हे सह-अर्जदार असणे अत्यावश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेची खात्री देता येते आणि दोन्ही मालकांना मालमत्तेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.

सह-अर्जदार

 • किमान वय

वेतनधारी -18 ते 65 वर्षे

 • तुम्ही सह-अर्जदारास का जोडावे?

 • जर तुम्हाला तुमची गृह कर्ज पात्रता वाढवायची असेल, तर तुम्ही सह-अर्जदार जोडू शकता, जरी ते सह-अर्जदार कमावते नसतील तरी. यामुळे तुम्हाला मोठ्या गृह कर्जासाठी पात्र बनवण्यास सुद्धा मदत होऊ शकते. तुमचे सह-अर्जदार हे तुमचे जोडीदार किंवा जवळचे कुटुंबातील सदस्य असू शकतात.

 • कारण ICICI HFC स्त्रियांना एक सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम व्याजदर प्रदान करते. किंवा जर तुम्ही तुमच्या गृह कर्जामध्ये तुमची तुमच्या पत्नी किंवा आईला जोडले तर ते कमावते नसले तरी देखील तुम्ही कमी व्याजदर मिळवण्यास पात्र थ्रू शकता.

 • तुमच्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असतील तर अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व सह-मालक हे सह-अर्जदार असणे अत्यावश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेची खात्री देता येते आणि दोन्ही मालकांना मालमत्तेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.

ICICI HFCकडून कर्ज का घ्यावे

तुम्ही 72 तासांपेक्षा कमी वेळेत गृह कर्ज मिळवू शकता. आमच्याकडे आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि जागच्या जागी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे, जेणेकरून कागदपत्रांसाठी अनेक विनंत्या व भेटी द्याव्या लागणार नाहीत. तुम्ही तुमच्या जवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत जाऊन सुद्धा तुमच्या कर्जाची प्रक्रिया सुरु करू शकता.

आमच्या स्थानिक तज्ञांना भेटण्याकरीता आमच्या कोणत्याही एका शाखेत जा. आमचे स्थानिक तज्ञ तुमच्या गृह खरेदीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलतील आणि तुमच्या परिसराशी ते परिचित असतील. तुमच्या जवळील शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा आणि समोरासमोर योग्य मार्गदर्शन मिळवा

तुमच्या जवळील ICICI HFCच्या शाखेस भेट देण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विशेष ऑफर्स. आमचे इन-हाऊस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफर्सच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्हाला एक आकर्षक डील मिळेल.

जेव्हा तुम्ही आमच्याकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्ही ICICI HFC कुटुंबाचा एक भाग बनता. हे केवळ एक कर्ज नाही, हा एक नातेसंबंध आहे. आमच्या प्रणालीत तुमचे कागदपत्र आधीच उपलब्ध असल्यामुळे आणि अनेक तपासण्या आधीच केलेल्या असल्यामुळे ICICI HFCचे एक विद्यमान ग्राहक म्हणून तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन त्वरित होऊ शकते. तुम्हाला आज गृह कर्जाची गरज आहे, उद्या सोने कर्ज किंवा बचत वाढवण्यासाठी एफडीची गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

अर्ज कोठे करावा

मदतीसाठी आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFC शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत जा. आमचे स्थानिक तज्ञ आमच्या जलद व सोप्या अशा गृह कर्ज अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करतील. तुम्ही 72 तासांच्या आत तुमचे कर्ज घेऊ शकता. तुमच्या जवळील शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा. जर तुमच्या जवळ ICICI HFCची शाखा नसेल तर तुमच्या कर्जाची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुमच्या जवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेस भेट द्या.

अर्ज कसा करावा

 1. आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या कर्जासाठीचा अर्ज सादर करण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ घ्या
 2. केवायसी तपासण्या पार पाडण्यासाठी परत न मिळणारे लॉगीन शुल्क रु. 5000 + (अधिक 18% ने रु. 900/- जीएसटी) भरा.
 3. तुमचे विद्यमान ईएमआय, वय, उत्पन्न आणि मालमत्तेचा अभ्यास करणाऱ्या आमच्या तज्ञ गटाकडून तुमच्या कर्जाच्या अर्जाचे त्वरित पुनरावलोकन करून घ्या.
 4. आमच्या प्रत्येक ICICI HFC शाखेत उपस्थित असलेल्या आमच्या तज्ञांच्या गटाद्वारे मंजूर केली गेलेली तुमची कर्जाची रक्कम मिळवा.
 5. कर्ज रक्कमेच्या 0.75% इतके किंवा रु. 11,000 यांपैकी जे जस्त असेल तितके प्रक्रिया शुल्क भरा.
 6. तुमच्या मालमत्तेच्या बांधकाम टप्प्यानुसार मंजूर करण्यात आलेली कर्जाची रक्कम वितरीत करण्यात येईल.

तुम्ही अजूनही एका परिपूर्ण घराचे स्वप्न बघत आहात, तर तुमच्या बजेटमधील घर शोधण्यासाठी तुम्ही आमच्या इझी-टू-युज प्रॉपर्टी सर्च पोर्टलचा वापर करू शकता.

गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर

तुमच्या ईएमआयमध्ये मूळ रक्कम आणि व्याज घटकांचा समावेश होतो. तुम्हाला झेपू शकत असलेल्या ईएमआयच्या आधारे तुमच्या गृह कर्जाची रक्कम मोजली जाईल. तुमच्या गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही जास्त मुदत निवडून तुमचे ईएमआय कमी करू शकता. आमचे गृह कर्ज कॅल्क्युलेटर तुम्हाला किती ईएमआय भरणे परवडेल यावर आधारित तुमचे आर्थिक नियोजन करण्यास तुम्हाला मदत करेल.

गृह कर्जाची रक्कम प्रविष्ट करा
Thirty Thousands
कर्ज कालावधी (महिने) प्रविष्ट करा
1 years 4 month's
Months
व्याज दर प्रविष्ट करा (दर साल)
%

तुमची EMI आहे

0


परतफेड रक्कम

0

व्याज रक्कम

0

खाली तपशील भरा

कृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा
कृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा
कृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा
कृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा
आपले शहर निवडा
कृपया अटी व शर्ती मान्य करा

वेतनधरी व्यक्तीसाठी गृहकर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

ही कागदपत्रे सादर करा आणि कार्यालयात अधिक चकरा न मारता कमीत कमी 72 तासांत तुमच्या कर्जास मंजुरी मिळवा.

 • तुम्ही स्वाक्षरी केलेला पूर्णपणे भरलेला अर्ज
 • ओळख व रहिवासी पुरावा (केवायसी), जसे आधार, पॅन कार्ड, निवडणूक प्रमाणपत्र, नरेगाद्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड
 • उत्पन्नाचा पुरावा, जसे किमान दोन महिन्याची तुमची पगाराची स्लीप, नवीनतम फॉर्म 16, आणि तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
 • मालमत्तेची कागदपत्रे (जोपर्यंत तुम्ही मालमत्ता निश्चित करीत नाही)

वेतनधार्यांसाठी आपले घर योजनेसाठी दर व शुल्क

आम्ही आमच्या दर व शुल्काबाबत पारदर्शक असण्याचा मुद्दा बनवतो.

शुल्क दर*

लॉगीन शुल्क (केवयसी तपासणीकरीता) 

रु. 5000

प्रक्रिया व प्रशासकीय शुल्क (मंजुरीच्या वेळी आकारण्यात आले)

कर्ज रकमेच्या 1% किंवा रु. 11,000 यापैकी जे अधिक आहे ते 

पूर्व भरणा शुल्क (फक्त गैर-वैयक्तिकसाठी)

जर तुम्ही तुमच्या कर्जाची सर्व रक्कम भरण्यास पात्र असाल तर तुम्ही सेटल ऑल निवडू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या गृह कर्जाचा भाग निवडू शकता, तुम्ही निवडलेल्या मुदतीवर काहीही फरक पडत नाही.

* वरील टक्केवारी ही लागू असलेल्या करांसाठी आहे आणि इतर कोणतीही वैधानिक आकारणी असल्यास

* अशा रकमेत दिलेल्या आर्थिक वर्षादरम्यान भरण्यात आलेल्या सर्व रकमेचा समावेश असेल.

* वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि इतर शासकीय कर, लिवाईज इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल.

डिस्क्लेमर:

येथे सांगितल्याप्रमाणे दर व शुल्क हे आयसीआयसीआय होम फायनान्सच्या विवेकानुसार वेळोवेळी बदल/सुधारणांच्या अधीन आहेत.

तसेच, जीएसटी, इतर कर व लिवाईज हे इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल.

आयसीआयसीआय होम फायनान्सवरील फ्लोटिंग व्याजदर हे आयसीआयसीआय होम फायनान्स प्राईम लीडिंग रेट सोबत (आयएचपीएलआर) जोडण्यात आलेले आहेत.

कॅल्क्युलेटर हे फक्त मार्गदर्शनाच्या उद्देशाने वापरण्यात आले आहे, ते ऑफर नाही आणि त्याचा परिणाम हा प्रत्यक्षापेक्षा वेगळा असू शकतो.

 

eNACH Mandate Registration Process - In 5 Easy Steps!

 

पगारदारांसाठी गृह कर्जाचे सामान्य प्रश्न

तुम्ही घरात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याच्या क्षणापासून कर्जासाठी अर्ज करण्यास सुरुवात करू शकता, मग जरी तुमची मालमत्ता निश्चित झाली नसेल तरी. तथापि, प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुमच्या हातात मालमत्तेची काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या मालमत्तेसाठी तुम्हाला द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीसाठी:

तुम्ही जास्तीत जास्त 25 वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज घेऊ शकता. तथापि, हा कालावधी 60 वर्षे (वेतनधारी व्यक्तींसाठी) किंवा वय वर्षे 70 (स्वयंरोजगारी व्यक्तींसाठी) किंवा निवृत्तीच्या वयाच्या पुढे यातून जे आधी असेल त्याच्या पुढे वाढू शकत नाही. आमच्याकडे आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या सर्व शाखांमध्ये कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट आहे, जे तुमच्यासोबत बसून तुम्हाला परवडू शकणारा मुदत कालावधी ठरविण्याकरिता तुमची मदत करतात. योग्य असा मुदत कालावधी निश्चित झाल्यावर, तुमचे उत्पन्न, वय व विद्यमान ईएमआय विचारात घेतले जाते.

तुम्हाला मासिक आधारावर तुमच्या गृह कर्जाचा हप्ता भरावा लागेल. तुम्ही ईएमआयचा पर्याय निवडू शकता, जेथे तुम्ही प्रत्येक महिन्यात सारखी रक्कम भरता (ईएमआय हे समान मासिक हप्त्यात असतात). किंवा तुम्ही एसयुआरएफ पर्याय किंवा स्टेप अप रिपेमेंट फॅसिलीटीचा पर्याय निवडू शकता, जेथे कालांतराने जसे जसे तुमचे मासिक उत्पन्न वाढते तसे तुमचे मासिक देयके वाढतात. पहिल्या पर्यायाचा फायदा हा आहे की जसे तुमचे उत्पन्न वाढेल तसे कालांतराने तुमचे मासिक देयके भरणे सोये होईल. दुसऱ्या पर्यायाचा फायदा हा आहे की जसे तुमचे उत्पन्न वाढते तसे तुम्ही तुमचे मासिक देयके वाढवू शकता आणि त्यामुळे तुमची एकूण मुदत घटते.

आमचे पात्रेतेचे निकष खूप लवचिक आहेत आणि पूर्ण करणे खूप सोपे आहे. आम्हाला सुद्धा खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते ज्यामुळे प्रक्रिया अधिक जलद होण्याची खात्री मिळते. आमच्या गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुम्ही गृह कर्जासाठी पात्र आहात किंवा नाही हे तुम्हाला त्वरित समजू शकते. तुम्ही गृह कर्जासाठी पात्र नसाल तर अशा प्रसंगी, तुमच्या जवळील ICICI HFC शाखेतील तसेच आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील आमचा कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा गट तुमची पात्रता वाढविण्यासाठी असलेल्या अनेक मार्गांविषयी तुम्हाला सूचित करू शकतात, त्यामुळे मदतीसाठी आजच संपर्क करा.

तुमचे सह-अर्जदार तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील एखादा सदस्य असू शकतो. तुमच्या सह-अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे. तुमच्या सह-अर्जदाराने कमावते असण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा समावेश करू शकता जरी ते कमाई करत नसतील तरी. खरेतर, एका स्त्रीला सह-जोडीदार म्हणून जोडल्याने तुमचे व्याजदर घटन्यास मदत होऊ शकते. तुमच्या मालमत्तेचे एकापेक्षा अधिक मालक असतील तर, अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व मालकांनी सह-अर्जदार होणे अत्यावश्यक आहे. सह-अर्जदारांना कशाप्रकारे आणि का जोडावे याविषयी आमच्या तज्ञ गटाकडून अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील आयसीआयसीआय एचएफडी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या शाखेस भेट द्या.

 • गृह कर्ज

आम्ही बांधकाम अंतर्गत मालमत्ता, ताब्यासाठी तयार असलेली मालमत्ता, पुनर्विक्री मालमत्ता, बांधकाम केल्या जाणाऱ्या मालमत्तांसाठी आणि निवासी मालमत्तेवर पुनर्वित्तासारख्या पर्यायावर सुद्धा गृह कर्ज देतो. तुम्ही तुमची मालमत्ता निश्चित होण्यापूर्वी सुद्धा गृह कर्ज घेऊ शकता. तुम्ही अद्यापही मालमत्ता शोधत असल, तर आमच्या ‘मालमत्ता शोधन’ (प्रॉपर्टी सर्च) या पर्यायाद्वारे योग्य आवास शोधण्यास आम्ही तुमची मदत करू.

 • आपले घर

इतर कोणत्याही योजनेपेक्षा उत्तम असलेली आमची आपले घर ही योजना भिन्न पाश्र्वभूमी आणि भिन्न उत्पन्न गटातील लोकांना परवडण्यायोग्य गृह कर्ज प्रदान करते आणि ही योजना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवय) या योजनेचे विस्तारित स्वरूप आहे. आपले घर ही योजना अतिशय लवचिक अशा पात्रतेच्या अटी प्रदान करते ज्या पूर्ण करणे अतिशय सोपे आहे.

 • जमीन कर्ज

घर बांधकामाच्या उद्देशाने एक निवासी प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही जमीन कर्ज घेऊ शकता. ते बांधकाम 3 वर्षांच्या आत पूर्ण होईल अशा लेखी हमीपत्रावर तुम्ही स्वाक्षरी करणे आवश्यक असेल.

 • कार्यालयाच्या जागेसाठी कर्ज

तुम्ही कार्यालयाचा परिसर वाढविण्यासाठी किंवा बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. कर्जाच्या रकमेत मालमत्तेच्या खरेदीच्या वेळी नुतनीकरणाच्या खर्च अंदाजाचा सुद्धा समावेश असू शकतो. तथापि, यामध्ये व्यावसायिक/संस्थात्मक मालमत्ता, उदा. कारखाने/ गोदामे/ शाळा/ संस्था/ रुग्णालये/ महाविद्यालये इत्यादींचा समावेश नसतो.

 • बॅलन्स ट्रान्स्फर

यापूर्वीच तुम्ही 2-3 वर्षांपासून वार्षिक 11% व्याजदराने गृह कर्जाची परतफेड करीत आहात. जर तुमचे गृह कर्जाचे व्याज हे आमच्यापेक्षा किमान 50 बेसिस पॉईंटने जास्त असेल, तर तुमचे ईएमआयचे ओझे कमी करण्यासाठी आमच्या बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेसह ICICI HFCमध्ये स्थानांतरीत व्हा, स्पर्धात्मक व्याजदराचा आनंद घ्या आणि आमच्या तज्ञांचे अविभाजित लक्ष प्राप्त करा.

 • टॉप-अप कर्ज

तुम्हाला मुलांचे शिक्षण किंवा लग्न, ग्राहक टिकाऊ वस्तू, नुतनीकरण इत्यादी कारणांसाठी अतिरिक्त वित्तीय गरज भासल्यास तुम्हाला त्याच मालमत्तेवर तुमच्या अस्तित्वात असलेल्या गृह कर्जाच्या सुरक्षेच्या आधारावर टॉप-अप कर्ज मिळू शकते.

 • मालमत्तेवर कर्ज

तुमच्याकडे मालमत्ता असल्यास, या पर्यायासह, त्या मालमत्तेवर तुम्हाला जास्तीत जास्त 15 वर्षे मुदतीसाठी वाजवी व्याजदारात कर्ज मिळू शकते.

 • मालमत्तेवर छोटे किंवा सूक्ष्म कर्ज

मालमत्तेवर छोटे कर्ज (एलएपी) हे रु. 3 लाखांपेक्षा कमी आणि रु. 15 लाखांपर्यंतचे कर्ज प्रदान करते जे 120 महिन्यांत फेडले जाऊ शकते.

 • भाडेपट्टीतील सवलत

तुमच्याकडे एखादी व्यावसायिक मालमत्ता असेल आणि त्यातून भाडे कमावणे अपेक्षित असेल, तर तुम्ही तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेऊ शकता जसे, तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा लग्न, सुरक्षा किंवा अनुषांगिक म्हणून या भाड्याचा उपयोग करणे.

होय, आम्ही नेहमीच तुम्हाला मदत करण्याचे मार्ग शोधत असतो. आम्ही आयसीआयसीआय मालमत्ता शोधन (प्रॉपर्टी सर्च) म्हणून ओळखल्या जाणारे इझी-टू-युज ऑनलाईन सर्च पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या घर खरेदीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सहकार्य करेल. ही सुविधा तुम्हाला तुमच्या गरजा व प्राधान्यानुसार सत्यापित मालमत्तांच्या क्युरेटेड यादीतून तुमचे आदर्श घर ओळखण्यास मदत करते. आम्ही आमच्या समर्पित स्थानिक मालमत्ता तज्ञांसह निवडलेल्या मालमत्तांसाठी क्षेत्र भेटी सुद्धा आयोजित करतो. पुढे, आम्ही तुम्हाला कायदेशीर कागदपत्रे आणि मालमत्तेच्या किमतीविषयी बोलणीसाठी सहकार्य करतो.

ही विनामुल्य सुविधा प्रथम विक्री मालमत्तांवर प्रदान केली जाते आणि सध्या ही सुविधा खालील नऊ शहरांमध्ये उपलब्ध आहे:

 1. मुंबई
 2. दिल्ली एनसीआर
 3. चेन्नई
 4. कोलकाता
 5. बेंगळूरू
 6. पुणे
 7. लखनऊ
 8. हैद्राबाद
 9. कोची

नाही, आयटी नियमावलींनुसार गृह कर्जासाठी अर्जदार व सह-अर्जदार दोघांच्याही नावाने फक्त एकच आयटी प्रमाणपत्र जारी केले जाईल.

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी अंतिम प्रमाणपत्र जारी केले जाते त्यामुळे तुम्हाला एप्रिल किंवा मे मध्ये आयटी चे प्रमाणपत्र मिळण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. तथापि, वर्षादरम्यान तुम्ही केव्हाही तात्पुरते आयटी प्रमाणपत्र मागू शकता. .

तुम्ही खालीलपैकी कोणतेही एक ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता:

 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट
 • भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेले निवडणूक ओळखपत्र
 • आधार कार्ड ताब्यात घेतल्याचा पुरावा
 • चालक परवाना
 • शासकीय अधिकाऱ्याची सही असलेले नरेगाद्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड

तुम्ही आधीच गृह कर्ज घेतले असेल परंतु उत्तम ग्राहक सेवा, उत्तम व्याज दर, आणि लवचिक अटी हव्या असतील तर ICICI HFCमध्ये स्थानांतर करण्याचा विचार करा. आमच्याकडे बॅलेन्स ट्रान्स्फर सुविधा आहे, या सुविधेचा उपयोग करून तुम्ही तुमचे गृह कर्ज कमीत कमी वेळ व प्रयत्न खर्च करून ICICI HFCमध्ये हस्तांतरित करू शकता. बॅलेन्स ट्रान्स्फर सुविधा ही वेतनधारी व स्वयंरोजगारी या दोन्ही प्रकारच्या भारतीय नागरिकांसाठी आहे.

होय, अधिक माहितीसाठी गृह कर्जाच्या पृष्ठावर जा.

तुमच्या जवळील ICICI HFC शाखेत जाण्याचा फायदा हा आहे की तेथे तुम्हाला विशेष ऑफर्स मिळतील. आमच्या शाखांमध्ये तुम्ही विविध ऑफर्सचा आनंद घेऊ शकता. आमचे इन-हाऊस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफरच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्हाला खरोखर उपयुक्त असे काहीतरी मिळू शकेल. दिवसाची डील शोधण्यासाठी शाखेत भेट त्या.

होय

होय