ओव्हरव्ह्यू / विहंगावलोकन - स्वयंरोजगारांसाठी अपना घर

अपना घर हे यापूर्वी आपण पाहिलेल्या एखाद्या गृहकर्जासारखे नाही. आपण लघू आणि मध्यम उद्योग कंपनीत नोकरी करत असाल किंवा एखाद्या कुटुंबांद्वारे चालविल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या मालकाकडे किंवा 

एलएलपीमध्ये नोकरी करत असाल; एखाद्या कारखान्याच्या शॉप फ्लोरवर काम करणे किंवा सिक्युरिटी सर्व्हिस फर्मचा भाग असाल, किंवा अशा प्रकारचे ब्लू कॉलर वर्कर असाल तर अपना घर तुमच्यासाठी आहे.

आमच्या ICICI HFCच्या 135 पेक्षा अधिक शाखांतील प्रत्येक शाखेत तुम्हाला मैत्रीपूर्ण, उपयुक्त असे स्थानिक तज्ञ भेटतील जे कर्ज प्रक्रीयेविषयी तुमच्या मनात असलेल्या धारणेत बदल घडवून आणतील.

पगारदारांसाठी अपना घरची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे

सोपे पात्रता निकष

आमच्या लवचिक पात्रता निकषांमुळे आणि मुलभूत दस्तऐवजांच्या आवश्यकतेमुळे आपले घर सोबत गृह कर्ज घेणे अधिक सहज सोपे झाले आहे. जरी तुमच्याकडे आयकरासारखा औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसेल, परंतु कर्ज परतफेडीचा तुमचा इतिहास चांगला असेल तरी आमचे स्थानिक तज्ञ तुम्हाला आवश्यक ती मदत करतील. 

सूचना: तुमची पात्रता वाढविण्यासाठी, तुम्ही तुमच्यासोबत एक सह-अर्जदार किंवा महत्वाचा कुटुंबातील सदस्य देखील जोडू शकता 

सर्वांसाठी घर

आपले घर हे उत्पन्न विभागातील गृह खरेदीदारांना मदत करते. मग तुम्ही एक वेतनधारी व्यक्ती असाल, एक किराणादुकानाचे मालक असा, किंवा तुमचा स्वतःचा इतर कोणताही व्यवसाय असेल जो तुम्ही काही वर्षांपासून चालवत आहात, आपले घर तुम्हाला एक घरमालक होण्याची संधी प्राप्त करून देऊ शकते.

त्वरित कर्ज वितरण

तुम्हाला कर्जाचे वितरण होण्यास जास्तीत जास्त 72 तासांचा कालावधी लागू शकतो कारण आमच्याकडे आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे. आमचे तज्ञ तुमच्या अर्जाचे जागच्या जागी पुनरावलोकन करू शकतात आणि सामोरासमोर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला वारंवार कार्यालयात येण्याची गरज नाही.

ICICI HFCकडे स्थानांतर

यापूर्वीच तुम्ही 2-3 वर्षांपासून वार्षिक 11% व्याजदराने गृह कर्जाची परतफेड करीत आहात. जर तुमचे गृह कर्जाचे व्याज हे आमच्यापेक्षा किमान 50 बेसिस पॉईंटने जास्त असेल, तर तुमचे EMIचे ओझे कमी करण्यासाठी आमच्या बॅलेन्स ट्रान्सफर सुविधेसह ICICI HFCमध्ये स्थानांतरीत व्हा, स्पर्धात्मक व्याजदराचा आनंद घ्या आणि आमच्या तज्ञांचे अविभाजित लक्ष प्राप्त करा.

विविध टप्प्यांवर घर

जरी तुम्ही एखाद्या मेट्रो सिटीच्या केंद्रस्थानी किंवा तिच्या बाह्यभागात राहत असाल, तरी तुम्ही तुमच्या कामाच्या प्रोफाईलवर, तुम्ही निवडलेली जमीन आणि तिच्या ठिकाणावर आधारित 20 लाखांपर्यंत (वेतनधारी) किंवा 50 लाखांपर्यंत (व्यावसायिक) गृह कर्ज घेऊ शकता. तुम्ही स्वयंनिर्मीत संपत्तीसाठी किंवा तुमच्या स्वताच्या जमिनीवरील प्लॉटवर घर बांधकामासाठी किंवा नियमित वसाहती आणि ग्राम पंचायतींतील निवासी संपत्ती पुनर्वित्त करण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

स्वयंरोजगारांसाठी अपना घरची पात्रता

 • राष्ट्रीयता

भारतीय, भारतातील रहिवासी

 • वय मर्यादा (प्राथमिक अर्जदार)

30 वर्षे ते 70 वर्षे (आपल्या वयाची 70 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीची मुदत निवडा. याने हे सुनिश्चित होईल की आपला व्यवसाय व्यवस्थापित करत असतांना आपण परतफेड पूर्ण कराल आणि नंतर पुढच्या पिढीकडे व्यवसाय सुपूर्त कराल)

 • अपना घर व्याज दर

आम्ही स्पर्धात्मक व्याजाने गृह कर्ज पुरविण्यासाठी वचनबद्ध आहोत; आमचे सध्याचे गृह कर्ज व्याज दर आहेतः

 • SEP - 14% द.सा.द.शे. च्या पुढे

 • SENP - 12.25% द.सा.द.शे. (30 लाखांपर्यंत)

 • AIP / रोख वेतन - 14% द.सा.द.शे.च्या पुढे

 • सह-स्वामित्व संपत्ती

जर आपल्या मालमत्तेचे एकापेक्षा अधिक मालक असतील तर ते दोघे किंवा सर्व अतिरिक्त मालकांनी सह अर्जदार असणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करते की आपली मालमत्ता सुरक्षित आहे आणि मालमत्तेतील गुंतवणूकीचा फायदा दोन्ही मालकांना होऊ शकेल.

सह-अर्जदार

 • वय

18 ते 80 वर्षे

 • तुम्ही सह-अर्जदारास का जोडावे?

 • जर तुम्हाला तुमची गृह कर्ज पात्रता वाढवायची असेल, तर तुम्ही सह-अर्जदार जोडू शकता, जरी ते सह-अर्जदार कमावते नसतील तरी. यामुळे तुम्हाला मोठ्या गृह कर्जासाठी पात्र बनवण्यास सुद्धा मदत होऊ शकते.

 • कारण ICICI HFC स्त्रियांना एक सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम व्याजदर प्रदान करते.

 • तुमच्या मालमत्तेत एकापेक्षा अधिक मालक असतील तर अशा प्रसंगी दोन्ही किंवा सर्व सह-मालक हे सह-अर्जदार असणे अत्यावश्यक आहे. यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेची खात्री देता येते आणि दोन्ही मालकांना मालमत्तेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.

ICICI HFC कडून कर्ज का घ्यावे?

आपले घर हे अशा लोकांसाठीचे पहिल्या प्रकारचे गृह कर्ज आहे ज्यांनी आधी कधीही कर्ज घेतले नाही, किंवा ज्यांचा कर्ज परतफेडीचा इतिहास चांगला आहे परंतु त्यांच्याकडे औपचारिक कागदपत्रे नाहीत. आम्ही सोप्या पात्रता निकषांद्वारे आपले घर हे उत्पादन तयार केले कारण आम्ही तुमच्या स्वतःच्या घराच्या स्वप्नाचे समर्थन करतो

तुम्ही कमीत कमी 72 तासांमध्ये कर्ज मिळवू शकता. आमच्याकडे आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFCच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेत कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक गट उपलब्ध आहे, जो कागदपत्रांची परत मागणी न करता जागच्या जागी तुमच्या कर्जाच्या अर्जाचे पुनरावलोकन करतो.

तुमच्या जवळील ICICI HFCच्या शाखेस भेट देण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विशेष ऑफर्स. आमचे इन-हाऊस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफर्सच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्हाला खरोखर उपयुक्त ठरणारे असे काहीतरी मिळेल. दिवसाची डील शोधण्यासाठी या. 

आमचे स्थानिक तज्ञ तुमच्या गृह खरेदीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलतील आणि तुमच्या परिसराशी ते परिचित असतील. तुम्हाला आवश्यक असलेले वित्तीय सहकार्य पुरवण्यास ते तुमच्याशी वचनबद्ध आहेत. तुमच्या जवळील शाखा शोधा आणि एका मैत्रीपूर्ण चेहऱ्यास भेटा. 

जेव्हा तुम्ही आमच्याकडून कर्ज घेता, तेव्हा तुम्ही ICICI HFC कुटुंबाचा एक भाग बनता. आमच्या प्रणालीत तुमचे कागदपत्र आधीच उपलब्ध असल्यामुळे आणि अनेक तपासण्या आधीच केलेल्या असल्यामुळे ICICI HFCचे एक विद्यमान ग्राहक म्हणून तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन त्वरित होऊ शकते. तुम्हाला आज गृह कर्जाची गरज आहे, उद्या सोने कर्ज किंवा बचत वाढवण्यासाठी एफडीची गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. . 

अर्ज कोठे करावा

मदतीसाठी आमच्या 135 पेक्षा अधिक ICICI HFC शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत जा. आमचे स्थानिक तज्ञ आमच्या जलद व सोप्या अशा गृह कर्ज अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करतील आणि 72 तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कर्जाचे वितरण करतील. आजच तुमच्या जवळील ICICI HFC शाखेस संपर्क करा. जर तुमच्या जवळ ICICI HFC शाखा नसेल तर तुमच्या कर्जाची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुमच्या जवळील ICICI बँकेच्या शाखेस भेट द्या.

तुम्ही आमच्याशी 1800 267 4455 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता.

अर्ज कसा करावा

 1. आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या कर्जासाठीचा अर्ज सादर करण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ घ्या
 2. केवायसी तपासण्या पार पाडण्यासाठी लॉगीन शुल्क रु. 3000 + 18% जीएसटी (परत न मिळणारे) भरा
 3. तुमचे विद्यमान EMI, वय, उत्पन्न आणि मालमत्तेचा अभ्यास करणाऱ्या आमच्या तज्ञ गटाकडून तुमच्या कर्जाच्या अर्जाचे त्वरित पुनरावलोकन करून घ्या.
 4. कर्ज रक्कमेच्या 1% इतके किंवा रु. 11,000+ 18% जीएसटी यांपैकी जे जस्त असेल तितके प्रक्रिया शुल्क भरा.
 5. तुमच्या मालमत्तेच्या बांधकाम टप्प्यानुसार मंजूर करण्यात आलेली कर्जाची रक्कम वितरीत करण्यात येईल. 

तुम्ही अजूनही एका परिपूर्ण घराचे स्वप्न बघत आहात, तर तुमच्या बजेटमधील घर शोधण्यासाठी तुम्ही आमच्या इझी-टू-युज प्रॉपर्टी सर्च पोर्टलचा वापर करू शकता.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अनुदान कॅल्क्युलेटर

तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (PMAY) पात्र आहात की नाही आणि आमच्या PMAY अनुदान कॅल्क्युलेटरसह तुम्ही किती अनुदान मिळवू शकता ते शोधा.

तुम्ही कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय मदत घेतली आहे का किंवा PMAY अंतर्गत कोणतेही लाभ घेतले आहेत का?
हे तुमचे पहिले पक्के घर आहे का?
एकूण कौटुंबिक उत्पन्न प्रविष्ट करा
Thirty Thousand
कर्जाची रक्कम
Ten Lakhs
कर्ज कालावधी (महिने) प्रविष्ट करा
8 year's and 1 month
महिने

PMAY Subsidy Amount

0


अनुदान वर्ग

EWS/LIG

EMI मधील निव्वळ कपात

निव्वळ कपात मूल्य

खाली तपशील भरा

कृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा
कृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा
कृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा
कृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा
आपले शहर निवडा
कृपया अटी व शर्ती मान्य करा

स्वयंरोजगारांसाठी अपना घर साठी आवश्यक कागदपत्रे

ही कागदपत्रे सादर करा आणि मंजुरीसाठी अधिक भेटी न देता 72 तासांच्या आत कर्ज मंजूर करून घ्या.

 • तुमची स्वाक्षरी असलेला पूर्णपणे भरलेला अर्ज
 • ओळख व रहिवासी पुरावा (KYC), जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळख पत्र, NREGA कडून जारी करण्यात आलेले जॉब कार्ड, इत्यादी.
 • उत्पन्नाचा पुरावा, जसे मागील 2 महिन्यांची सॅलरी स्लीप, नवीनतम फॉर्म 16, आणि तीन महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट
 • मालमत्तेची कागदपत्रे (जोपर्यंत तुम्ही मालमत्ता निश्चित केली नाही)

स्वयंरोजगारांसाठी गृह कर्जाचे दर व शुल्क

आम्ही आमच्या दर व शुल्काबाबत पारदर्शक असण्याचा मुद्दा बनवतो. 

शुल्क दर*
लॉगीन शुल्क (केवयसी तपासणीकरीता) रु 3000 + 18% GST
प्रक्रिया व प्रशासकीय शुल्क (मंजुरीच्या वेळी आकारण्यात आले) कर्जाच्या रकमेपैकी 2% (स्वयंरोजगार) किंवा ₹ 11,000 + 18% जीएसटी, जे अधिक असेल ते*
पूर्व भरणा शुल्क (फक्त गैर-वैयक्तिकसाठी) जर तुम्ही तुमच्या कर्जाची सर्व रक्कम भरण्यास पात्र असाल तर तुम्ही सेटल ऑल निवडू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुमच्या गृह कर्जाचा भाग निवडू शकता, तुम्ही निवडलेल्या मुदतीवर काहीही फरक पडत नाही. आम्ही पूर्व भरणासाठी 0-2% इतका किमान दर आकारू.

वरील टक्केवारी ही लागू असलेल्या करांसाठी आहे आणि इतर कोणतीही वैधानिक आकारणी असल्यास अशा रकमेत दिलेल्या आर्थिक वर्षादरम्यान भरण्यात आलेल्या सर्व रकमेचा समावेश असेल.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि इतर शासकीय कर, लिवाईज इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल.

डिस्क्लेमर:

येथे सांगितल्याप्रमाणे दर व शुल्क हे ICICI होम फायनान्सच्या विवेकानुसार वेळोवेळी बदल/सुधारणांच्या अधीन आहेत.

तसेच, GST, इतर कर व लिवाईज हे इत्यादी प्रचलित दराप्रमाणे लागू झाल्यास या शुल्कापेक्षा जास्त व पुढील शुल्क आकारण्यात येईल. 

ICICI होम फायनान्सवरील फ्लोटिंग व्याजदर हे ICICI होम फायनान्स प्राईम लीडिंग रेट सोबत (IHPLR) जोडण्यात आलेले आहेत.

कॅल्क्युलेटर हे फक्त मार्गदर्शनाच्या उद्देशाने वापरण्यात आले आहे, ते ऑफर नाही आणि त्याचा परिणाम हा प्रत्यक्षापेक्षा वेगळा असू शकतो.

अपना घर साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ करण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारत सरकारने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने, घर खरेदीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत परवडणारी घरे किंवा कमी किमतीची गृहनिर्माण योजना सुरू केली आहे.

परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत मिळालेल्या फायद्यांमध्ये शहरी भागात घराच्या अधिग्रहण / बांधकामासाठी (पुनर्खरेदीसह) घेतलेल्या गृह कर्जावरील व्याज अनुदान समाविष्ट आहे. अनुदान लाभ लाभार्थीचे उत्पन्न आणि खरेदी केलेल्या घर / मालमत्तेच्या आकारावर अवलंबून असते.

ICICI होम फायनान्समध्ये आम्ही जाणतो की वेगवेगळ्या लोकांच्या आर्थिक गरजा आणि प्राथमिकता वेगवेगळ्या असतात. ICICI HFC अपना घर गृह कर्जासह, आपण 20 वर्षांपेक्षा अधिक परतफेडीचा कालावधी निवडू शकता, ज्यामुळे तुमचा EMI भार कमी होईल. तथापि, अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंत मर्यादित राहील.

परवडणाऱ्या गृह कर्जासाठी किमान डाऊन पेमेंट हे घर / मालमत्तेच्या एकूण किंमतीच्या 20 टक्के आहे.

अशा प्रकारे, जर आपण रुपये 30 लाख किंमतीचे घर विकत घ्यायचे ठरविले आणि विशेषत: परवडणाऱ्या घरांसाठी असलेल्या गृहनिर्माण योजनांसाठी बनवलेल्या ICICI HFC अपना घर गृह कर्जामध्ये आपल्याला किमान रुपये 6 लाखांचे डाऊन पेमेंट करावे लागेल, जे आपल्या घराच्या किंमतीच्या 20 टक्के आहे. 

ICICI HFC अपना घर सारखे परवडणारे गृहनिर्माण कर्ज निवासी युनिटच्या खरेदी / बांधकाम / वाढीसाठी मिळू शकते. वर्धित घटकांमध्ये आपल्या विद्यमान घरासाठी अतिरिक्त मजला किंवा शौचालय बांधणे यासारखे घटक समावेश असू शकतात. परवडणाऱ्या गृह कर्जाच्या अंतर्गत घर / मालमत्ता परत खरेदी करण्यास देखील परवानगी आहे.

आयसीआयसीआयएचएफसीचं अपना घर होम लोन अशाच लोकांसाठी आहे, जे घरासाठी परवडणाऱ्या कर्जाचा पर्याय शोधत आहेत. अपना घर होम लोन अंतर्गत कर्जाची जास्तीत जास्त रक्कम ₹30 लाख आहे. जर तुम्ही निवडक मेट्रो शहरांमध्ये घर खरेदी करत असाल तर कर्जाची रक्कम ₹ 100 लाखांपर्यंत जाऊ शकते.

अपना घर होम लोन स्कीम ही प्रधान मंत्री आवास योजनेचा (पीएमएव्हाय) विस्तार म्हणून निर्माण केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला ₹ 2.67 लाख सबसिडी लाभ दिला जातो.

तुम्ही पगारदार वैयक्तिक असा किंवा बिझनेसचे मालक, अपना घर होम लोन स्कीम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्वत:च्या घराचे मालक होण्याची संधी देते. अपना घर विविध उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध आहे आणि इतर होम लोन प्रॉडक्ट्समध्ये असलेल्या मर्यादा ह्यात मोडल्या आहेत. तुमच्याकडे आयटीआरसारखा उत्पन्नाचा पुरावा नसेल तरीही आमचे स्थानिक तज्ञ तुमच्या बिझनेसचं स्वरूप समजून घेतात आणि तुमच्या उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी तुमच्यासोबत वेळ घालवतात. तुम्हाला सुविधाजनक ठरणारी कर्जाची रक्कम आणि मुदत ठरवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं.

नवीन आणि चालू असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी सध्या 1% जीएसटी दर लागू आहे. परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाची व्याख्या अशी आहे:

 • मेट्रोपोलिटन शहरांमधील घरे (दिल्ली-एनसीआर, कोलकाता, चेन्नई, मुंबई, हैद्राबाद आणि बेंगलोर) ज्यांचं चटई क्षेत्रफळ 60 चौरस मीटर्सपर्यंत आहे.
 • शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 90 चौरस मीटर्सपर्यंत चटई क्षेत्रफळ असलेली घरे
 • मेट्रो आणि नॉन-मेट्रोमध्ये ₹ 45 लाखांपर्यंत एकूण किंमत असलेली घरे