एक नजर-सोन्यावर कर्ज

तुम्ही कितीही नियोजन केलं तर अचानक खर्च उभे राहातात. कधी वैद्यकीय गरज निर्माण होते तर कधी बिझनेसमध्ये तात्काळ रोख रकमेची गरज असते. अशावेळी आमचं सोन्यावरील कर्ज उपयोगी पडतं. कारण ह्यासोबत आहे निश्चित, अचानक न वाढणारा व्याज दर. जो तुमच्या कर्जाच्या मुदती दरम्यान एकसमान राहातो.

हे कर्ज सुलभ, जलद आणि सुरक्षित आहे. त्यासाठी जवळच्या ICICI HFC शाखेत या आणि पैशांची गरज लगेच भागवा.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ - सोन्यावर कर्ज

कर्जाचं जलद वाटप

तुम्ही फक्त जवळच्या ICICI HFC शाखेत भेट द्या. तुम्हाला काही तासांमध्ये 30 मिनिटांमध्ये कर्ज मिळेल. आमच्या ICICI HFC शाखेत सोन्याच्या किंमतीचे मुल्यांकन करणारे तज्ञ आहेत. जे तुमच्या उपस्थितीत सोन्याची किंमत सांगतात. त्याच शाखेतील आमची सेल्स बिझनेस टीम तुमच्या अर्जाची लगेच छाननी करते आणि कर्जाचं वाटप करते.

अचानक न वाढणारा व्याज दर

ICICI HFC कडून सोन्यावर कर्ज घेतल्यावर कर्जाच्या मुदतीत कोणत्याही टप्प्यावर तुमचा व्याज दर बदलत नाही. हा व्याज दर दरसाल 13% ते 17% आहे.

परतफेडीचे सुलभ पर्याय

 • ‘कर्जाच्या मुदतीत केव्हाही पूर्व परतफेड करा
 • मुदतीच्या समाप्तीला व्याजासह संपूर्ण परतफेड करा (बुलेट परतफेड)

कर्जाची लवचिक रक्कम

आमचं सोन्यावरील कर्ज ₹ 10,000 पासून सुरू होतं आणि ₹ 10 लाखांपर्यंत मिळतं. म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या मालमत्तेमुळे तुम्ही अचानक निर्माण झालेली गरज भागवू शकता. 

तुमचं सोनं सुरक्षित राहातं

तुम्ही जवळच्या ICICI HFC शाखेत सोनं जमा केल्यावर ते तुमच्या समोर सीलबंद केलं जाईल. तुमचं सोनं निगराणीखाली राहावं आणि सदैव सुरक्षित राहावं ह्यासाठी उच्च दर्जाच्या फिचर्ड वॉल्टमध्ये ठेवलं जाईल.

ICICI HFCकडून कर्ज का घ्यायचं?

आमच्या शाखांमध्ये सोन्याचं मुल्यांकन करणारे तज्ञ आहेत. आम्ही तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कर्ज देतो.

तुम्ही ICICI HFC कर्ज घेता तेव्हा तुम्ही ICICI HFC कुटुंबाचा एक भाग बनता. ICICI HFCचे वर्तमान ग्राहक म्हणून तुमच्या अर्जाची जलद छाननी होईल. कारण अनेक तपासण्या आधीच झालेल्या असतील. तुम्हाला सध्या सोन्यावर कर्ज हवं असेल तरीही भविष्यात स्वत:चं घर घेण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी किंवा बचत वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

जवळच्या ICICI HFC शाखेमध्ये येण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला स्पेशल ऑफर्स मिळतात. तुम्ही सूट असलेला दर मिळवू शकता आणि आमच्या शाखेत अनेक ऑफर्सही प्राप्त करू शकता. आमचे इन-हाउस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफरचा लाभ समजावून सांगतील, ज्यामुळे तुम्ही स्वत:साठी एक योग्य ऑफर निवडू शकाल.

पात्रता - सोन्यावर कर्ज

ICICI HFC कडून सोन्यावर कर्ज घेण्यासाठी तुम्ही काही अटी पूर्ण करायला हव्यात.

 • तुम्ही भारतीय निवासी असायला हवं
 • तुमचं वय किमान 25 वर्षांचं असावं
 • कर्जाची मुदत पूर्ण होईल तेव्हा तुमचं वय 70 पेक्षा जास्त नसावं, ज्यामुळे तुम्ही तुमची सोनेरी वर्ष ईएमआय न भरता मजेत घालवू शकाल.
 • तुम्ही सादर करत असलेले सोन्याचे दागिने तुमच्या मालकीचे असावेत
 • तुम्ही वैयक्तिक असावं (अवैयक्तिकांसाठी आमचं सोन्यावरील कर्ज उपलब्ध नाही)

अर्ज कसा करावा

सोन्यावरील कर्जासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला काही तास/मिनिटे लागतील. ते मंजूर करून घ्या. त्यासाठी तुम्ही असं करा.

जवळच्या ICICI HFC शाखेत या आणि तुमचं सोनं सादर करा.

प्रत्येक शाखेत मूल्यांकन करणारे तज्ञ आहेत, जे तुमच्या सोन्याचे मूल्यांकन करतील आणि तुमचं सोनं किती किंमतीचं आहे ते सांगतील. ही किंमत त्या दिवशी असलेली सोन्याची किंमत असेल.

सोन्यावरील कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

ICICI HFCच्या सोन्यावरील कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे जवळच्या शाखेत न विसरता घेऊन जा:

 • केव्हायसी कागदपत्रे (ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
 • पॅन/फॉर्म 60
 • फोटो
 • बँकेचा कँसल केलेला चेक

अस्वीकृती:

 • वर उल्लेख केलेला दर, फी ही आयसीआयसीआय होम फायनान्सच्या संपूर्ण मर्जीनुसार वेळोवेळी होणार्‍या बदलाअधीन/नुतनीकरणाअधीन.

Benefits of ICICI HFC Gold Loan

 

सोन्यावरील कर्जासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ICICI HFC कडून सोन्यावरील कर्ज घेण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे निश्चित, अचानक न वाढणारा व्याज दर मिळतो. जो तुमच्या कर्जाच्या मुदतीत एकसमान राहातो.

जर मुदत संपण्याआधी तुम्ही कर्जाची परतफेड केली तर तुमचं सोनं तुम्हाला लगेच देण्यात येईल आणि तुम्ही पुढील व्याज वाचवू शकाल.

उच्च दर्जाचं फिचर्स वॉल्ट असल्यामुळे तुमचं सोनं निगराणी अंतर्गत आणि सदैव सुरक्षित राहील. 

 • किमान व्याज 13%
 • कमाल व्याज 17%
 • कर्जाच्या रकमेनुसार 0.25% ते 1% कार्यवाही शुल्क

आयसीआयसीआय होम फायनान्सच्या प्रत्येक शाखेमध्ये तुमच्या सोन्याची शुध्दता मोजणारे तज्ञ आहेत. दर दिवशी सोन्याची दर ग्रॅमची किंमत लक्षात घेऊन तुमच्या सोन्याची किंमत ठरवली जाईल आणि तुमच्या सोन्यावरील कर्ज ठरवले जाईल.

तुम्ही ऑनलाइन फंड ट्रान्सफरद्वारे सोन्यावरील कर्जाची परतफेड करू शकता. तुमची कर्जाची रक्कम पोहोचली की तुमचं सोनं तुम्हाला दिलं जाईल. ज्यामुळे तुम्ही मुदतीआधी परतफेड केली तर व्याज वाचवू शकाल.

दरसाल 6% दंडात्मक व्याज आहे. कर्ज भरायला विलंब झाला तर हे व्याज भरावं लागेल.

हो, तुम्ही कर्ज प्रीपे करू शकता. त्यासाठी प्रीपेमेंट शुल्क नाही.

नाही

आम्ही ज्यामध्ये तुमचं सोनं ठेवतो त्यात उच्च दर्जाची फिचर्स आहेत. ज्यामुळे तुमचं सोनं निगराणी अंतर्गत आणि सदैव सुरक्षित असल्याची खात्री मिळते. 

नाही

तुम्हाला कमीत कमी ₹ 10,000 कर्ज मिळेल. ज्यामुळे वैयक्तिक किंवा बिझनेससंबंधी पैशांची आवश्यकता निर्माण झाली तर ती जलद आणि सोप्या पध्दतीने सोडवून चिंतामुक्त होता येईल. थोडक्यात, काही तासांमध्ये तुम्ही आवश्यक पैशांची सोय करू शकता.