ओव्हरव्हू / विहंगावलोकन - मायक्रो एलएपी

आपण कदाचित एक छोटासा व्यवसाय करीत असाल परंतु आपली स्वप्ने अद्यापही आयुष्यापेक्षा मोठी असू शकतात.

ICICI HFC लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (एलएपी) सह, आपणास वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो, सर्व प्रकारच्या त्वरित गरजांसाठी ₹ 3 लाखांपासून लघू कर्जासह जलद आणि सहज वित्तपुरवठा मिळू शकेल. आपल्याला कर्ज मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा त्रास होवू शकतो, ते मुद्दे समजतात; म्हणून आम्ही आयकर विवरणपत्रांशिवाय आपल्याला मालमत्तेवरील कर्ज देऊ शकतो.

वैयक्तिक असो की व्यावसायिक, आपली सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेला पाठिंबा देणे हाच आमचा विश्वास आहे. आपल्या वाढत्या व्यवसायाच्या यशाशी कोणतीही तडजोड न करता, आपण आपल्या कुटुंबाला एक आरामदायक जीवनमान पुरवू शकता.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे - मायक्रो एलएपी

सोयीस्कर देय अटी

आपली गरज मोठी असेल किंवा लहान असेल, आम्ही या सर्वांना वित्तपुरवठा करतो. एलएपी ₹ 3 लाखांइतके कमी आणि ₹ 15 जास्तीत जास्त लाखांपर्यंत कर्ज देते. आमचे तांत्रिक तज्ञ आपल्या कर्जासाठी आरामदायी परतफेड मुदत ठरविण्यासाठी आपल्याला वेळ देतात, जे 120 महिन्यांपर्यंत असू शकते.

सुलभ पात्रता

ICICI HFCकडून मालमत्तेवर कर्ज घेणे सोपे आहे कारण आमच्याकडे पात्रतेचे सोपे निकष आहेत आणि मूलभूत कागदपत्रांचीच आवश्यकता आहे. आपल्याकडे आयटीआरसारखे औपचारिक उत्पन्नाचे पुरावे नसले तरीही, आमच्या तज्ञांना आपल्या व्यवसायाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर वेळ घालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आपली पात्रता वाढविण्यासाठी, आपल्या कमावत्या जोडीदारासारखा किंवा कुटुंबातील नजीकच्या सदस्याला सह अर्जदार म्हणून जोडा.

वेगवेगळ्या जॉब प्रोफाइलसाठी कर्ज

एलएपी पगारदार व्यक्ती जसे की सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट व्यावसायिक आणि डॉक्टर, वकील, सीए, व्यापारी आणि छोटे व्यावसायिक अशा स्वयंरोजगार व्यक्तींना देखील समर्थन देते. आम्ही आपल्यासारख्या छोट्या व्यवसायांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत कारण आम्हाला विश्वास आहे की तुमच्यासारख्या एसएमई आणि एमएसएमई हेच भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत.

त्वरित कर्ज वितरण

आपल्यासारख्या सुस्थापितांसोबत आमच्या 135+ ICICI HFC शाखेत आपण 72 तासांपेक्षा कमी वेळात एलएपी मिळवू शकता. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि शाखेमध्येच आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यासाठी आमच्याकडे कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची एक टीम आहे, जेणेकरुन आपल्याला फेऱ्या माराव्या लागणार नाहीत आणि आम्ही पुन्हा पुन्हा कागदपत्र मागणार नाही.

व्याज दर

आपल्याकडे आधीपासूनच मालमत्तेवरील कर्ज असल्यास देखील आपला ईएमआयचा बोजा कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक व्याजदराचे पर्याय मिळविण्यासाठी आपण ICICI HFCकडे जाऊ शकता. आमच्या बॅलन्स ट्रान्सफर सुविधेसह आपण आपली एलएपी ICICI HFCमध्ये बदलू शकता आणि ICICI HFC कुटुंबात सामील होऊ शकता.

वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या गरजा संतुलित करा

कोणतेही स्वप्न मोठे किंवा लहान नसते आणि आम्ही त्यास महत्त्व देतो. आपल्या मालमत्तेवर ₹ 3 लाख ते ₹ 15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. आपल्या किराणा दुकानाच्या व्यवसायाचा विस्तार असो, केटरिंग व्यवसायासाठी दीर्घकालीन खेळते भांडवल असो किंवा आपल्या मुलाच्या शिक्षणास वित्तपुरवठा असो, आपण आमच्याकडे येवू शकता.

ICICI HFCकडून कर्ज का घ्यावे?

लॅप (एलएपी) हे उत्पादन तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आमचे असे मत आहे की औपचारिक कागदपात्रांच्या अभावामुळे कोणालाही त्यांचे लक्ष साध्य करण्यापासून रोखले जाऊ नये. आम्ही लॅप प्रारंभ यासारखी कर्जप्रक्रिया सुलभ आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तणाव मुक्त बनवणारी उत्पादने तयार करतो.

तुमच्या स्थानिक तज्ञांना भेटण्यासाठी आमच्या कोणत्याही शाखेस भेट द्या. तुमच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला मदत करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. ते तुमच्या भाषेत बोलतात आणि तुमच्या परिसराशी ते परिचित आहेत. तुमच्या जवळील शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा आणि सामोरा समोर योग्य मार्गदर्शन घ्या.

आयसीआयसीआय एचएफसीच्या प्रत्येक शाखेत, तुम्हाला कमीत कमी 72 तासात कर्ज मिळू शकते. आमच्याकडे कायदेशीर व तांत्रिक तज्ञांचा एक चमू प्रत्यक्ष उपस्थित असेल जो अनेक भेटी किंवा कागदपत्रांसाठी वारंवार विनंतीशिवाय जागेवरच तुमच्या कर्जाच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल.

विशेष ऑफर्स हा तुम्ही जवळच्या आयसीआयसीआय एचएफसी शाखेत जाण्याचा एक मोठा फायदा आहे. आमचे इन-हाउस तज्ञ तुम्हाला प्रत्येक ऑफरच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन करतील, त्यामुळे तुम्ही खरोखर उपयुक्त असे काहीतरी निवडू शकता. दिवसाची डील शोधण्यासाठी चला.

जेव्हा तुम्ही आमच्याकडून एखादे कर्ज घेता, तेव्हा तुम्ही आयसीआयसीआय एचएफसी कुटुंबांचा एक भाग बनता. हे फक्त एक कर्ज नाही, तर ते एक नाते आहे. आयसीआयसीआय एचएफसीचे एक विद्यमान ग्राहक म्हणून तुमच्या अर्जाचे अधिक त्वरेने पुनरावलोकन केले जाऊ शकते, कारण अनेक तपासण्या यापूर्वीच झाल्या आहेत आणि तुमची कागदपत्रे आधीच आमच्या सिस्टीममध्ये आहेत. आज, तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजा ट्रॅकवर ठेवण्यासाठी एका कर्जाची आवश्यकता असू शकते. परंतु उद्या, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असला किंवा तुम्ही तुमची बचत वाढवण्यासाठी एफडीकडे पाहत असाल, तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. 

अर्ज कोठे करावा

आपल्याला आवश्यक असलेली सर्व मदत मिळविण्यासाठी आमच्या 135+ ICICI HFCच्या कोणत्याही शाखेत प्रवेश करा. आमचे नजीकचे तज्ञ आमच्या जलद आणि सुलभ कर्ज अर्ज प्रक्रियेद्वारे आपली मदत करू शकतात. आपण आपले कर्ज किमान 72 तासांत मिळवू शकता कारण आम्हाला फारच मूलभूत कागदपत्रे आवश्यक आहेत आणि आपल्या पात्रतेसाठी सोपी मानके आम्ही प्रदान करतो. आपली जवळची शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्याजवळ ICICI HFC शाखा नसल्यास आपल्या कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्या जवळच्या आयसीआयसीआय बँक शाखेत जा.

आपण आम्हाला 1800 267 4455 वर कॉल देखील करू शकता 

अर्ज कसा करावा

 1. आवश्यक कागदपत्रांसह आपला कर्ज अर्ज सबमिट करण्यासाठी केवळ 10 मिनिटे द्या
 2. नॉन रीफंडेबल / परत न मिळणारे ‘अ‍ॅप्लिकेशन’ किंवा ‘लॉगिन’ शुल्क ₹ 7000 किंवा ₹ 10,000 (मालमत्तेनुसार) + 18% जीएसटी भरा
 3. आपले विद्यमान ईएमआय, वय, उत्पन्न आणि मालमत्तेचा अभ्यास करणार्‍या तज्ञांच्या आमच्या कार्यसंघाद्वारे आपल्या कर्जाच्या अर्जाचे त्वरित पुनरावलोकन करा
 4. आमच्या ICICI HFC शाखेत उपस्थित असलेल्या तज्ञांच्या आमच्या टीमद्वारे कर्जाची रक्कम मंजूर करून घ्या
 5. तुमच्या कर्जाच्या मंजुरीच्या वेळी कर्जाच्या रक्कमेच्या 1% किंवा 1.5% (मालमत्तेनुसार) + जीएसटी @18% इतकी प्रक्रिया / प्रशासकीय फी भरा.

पात्रता - एलएपी

पगारदार व्यक्ती

 • राष्ट्रीयत्व

भारतीय, भारताचे नागरिक

 • वय मर्यादा (प्राथमिक अर्जदार)

28 वर्षे ते 60 वर्षे

 • किमान उत्पन्न

₹ 7,000 दरमहा

 • कमाल कर्ज रक्कम

₹ 15 लाख

 • प्रारंभ एलएपी व्याज दर

आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करताना आपण ट्रॅकवर राहावे याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. म्हणूनच आम्ही एकाधिक व्याज पर्याय प्रदान करतो. आमचे सध्याचे व्यावसायिक मालमत्ता कर्जाचे व्याज दर असे आहेत: फ्लोटिंग रेट - 12.15% पासून पुढे आणि निश्चित-दर - 13.10% पासून पुढे

 • भागीदारी मालकीची मालमत्ता

आयसीआयसीआय एचएफसी सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी महिलांना उत्तम व्याजदर पुरवते. जर तुम्ही तुमच्या पत्नी किंवा आईला तुमच्या गृह कर्जात शामिल केले, तर तुम्ही किमान व्याज दर मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता, जरी ते कमावते नसतील तरी.

स्वयं'रोजगार

 • राष्ट्रीयत्व

भारतीय, भारताचे नागरिक

 • वय मर्यादा (प्राथमिक अर्जदार)

28 वर्षे ते 60 वर्षे

 • उत्पन्न मर्यादा

₹ 1 लाख द.सा.द.शे. ते ₹ 15 लाख द.सा.द.शे.

 • एलएपी व्याज दर

आपली किमान व्याजदराने व्यावसायिक मालमत्ता कर्जाची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे सध्याचे कर्जाचे व्याज दर असे आहेत: फ्लोटिंग रेट - 12.15% पासून पुढे आणि निश्चित-दर - 13.10% पासून पुढे

 • भागीदारी मालकीची मालमत्ता

आयसीआयसीआय एचएफसी सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी महिलांना उत्तम व्याजदर पुरवते. जर तुम्ही तुमच्या पत्नी किंवा आईला तुमच्या गृह कर्जात शामिल केले, तर तुम्ही किमान व्याज दर मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता, जरी ते कमावते नसतील तरी.

सह-अर्जदार

 • किमान वय

पगारदार आणि स्वयंरोजगार - 18 ते 65 वर्षे

 • आपण सह-अर्जदार का जोडावे?

 • आपणास आपली गृह कर्जाची पात्रता वाढवायची असल्यास, आपण सह-अर्जदार जोडू शकता. हे आपल्याला मोठ्या गृह कर्जासाठी पात्र ठरण्यास देखील मदत करू शकते. आपला सह-अर्जदार आपला जोडीदार किंवा कुटुंबातील निकटचा सदस्य असू शकतो.

 • ICICI HFC महिलांना सह-अर्जदार म्हणून अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अधिक चांगला व्याज दर प्रदान करते.

एलएपीसाठी आवश्यक कागदपत्रे

खाली दिलेली महत्त्वाची कागदपत्रे आमच्या 135+ ICICI HFC शाखेपैकी कोणत्याही शाखेमध्ये घेवून या आणि अनेक वेळा फेऱ्या न मारता, आपले कर्ज 72 तासा इतक्या कमी वेळात मंजूर करून घ्या.

पगारदार व्यक्ती

 • आपण स्वाक्षरी केलेला पूर्ण भरलेला अर्ज,
 • आधार, PAN कार्ड, मतदार ओळखपत्र, NREGAने जारी केलेले जॉब कार्ड इ. सारखा ओळखीचा आणि राहण्याचा पुरावा (KYC)
 • उत्पन्नाचा पुरावा, जसे की नवीनतम 2 उत्पन्न परतावे, नवीनतम दोन वर्षांचे 16 नंबर फॉर्म आणि तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट इ.
 • मालमत्ता कागदपत्रे

स्वयंरोजगार व्यक्ती

 • आपण स्वाक्षरी केलेला पूर्ण भरलेला अर्ज,
 • PAN कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार इ. सारखा ओळखीचा आणि राहण्याचा पुरावा (KYC)
 • उत्पन्नाचा पुरावा, जसे की नवीनतम 2 उत्पन्न परतावे, नवीनतम दोन वर्षांचे पी अँड एल खाते / नफा आणि तोटा खाते आणि बी / एस (वेळापत्रकांसह), सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट इ.
 • मालमत्ता कागदपत्रे

मायक्रो एलएपी साठी दर आणि शुल्क

आपल्याला हे जाणून घेण्याचा हक्क आहे की आपल्याला आपल्या कर्जा प्रति किती रक्कम आणि कधी भरावी लागेल. खाली दिलेल्या यादी मध्ये आपल्याला लागू असेलेल्या शुल्क आणि दर यांच्याबद्दल माहिती मिळेल. आपले कर्ज पारदर्शक राहील, याची आम्ही काळजी घेतो, जेणेकरून आमच्या शाखांमध्ये असलेल्या स्थानिक तज्ञांची आपण सहज मदत मिळवू शकता.

शुल्क दर*
लॉगिन / अर्ज फी (KYC चेकसाठी) ₹ 7,000 किंवा ₹ 10,000 (मालमत्तेवर अवलंबून) + जीएसटी 18% 
प्रक्रिया / प्रशासकीय फी (मंजुरीच्या वेळी शुल्क आकारले जाते) कर्जाच्या रकमेच्या 1% किंवा 1.5% (मालमत्तेनुसार) + जीएसटी + 18%
प्रीपेमेंट शुल्क

व्यक्तींसाठी (पगारदार किंवा स्वयंरोजगार), जर आपण कर्जाचा काही भाग किंवा आपल्या सर्व प्रारंभ एलएपीची भरपाई करण्यास सक्षम असाल तर आपण तसे करू शकता.

आपल्या सोयीनुसार आपण निवडलेला कालावधी कितीही असेल तरीही. 

गैर-व्यक्तींसाठी आम्ही प्रीपेमेंटसाठी कमीतकमी 4% दर आकारतो, भागांमध्ये किंवा पूर्ण. पीओएस रक्कमेवर नॉन एचएल साठी कन्व्हर्जन / रूपांतर शुल्क 1.00%, तसेच लागू कर

रूपांतरण शुल्क पीओएस रकमेवर नॉन-एचएलसाठी 1.00%, अधिक लागू कर

* वरील टक्केवारी लागू कर आणि इतर कोणत्याही वैधानिक आकारणी, असल्यास वगळता आहेत

* अशा रकमेमध्ये दिलेल्या आर्थिक वर्षात प्रीपेड केलेल्या सर्व रक्कम समाविष्ट केली जाईल

अस्वीकरण: 

 • वर नमूद केलेले दर, फी आयसीआयसीआय होम फायनान्सच्या विवेकबुद्धीनुसार वेळोवेळी बदल / फेरबदल करण्याच्या अधीन आहेत.
 • तसेच, जीएसटी, इतर कर आणि आकार लागू असलेल्या प्रचलित दराप्रमाणे लागू होतील आणि या शुल्क व्यतिरिक्त आकारले जातील.
 • आयसीआयसीआय होम फायनान्सवरील फ्लोटिंग व्याज दर आयसीआयसीआय होम फायनान्स प्राइम लेन्डिंग रेट (आयएचपीएलआर) शी जोडले गेले आहेत.

मायक्रो एलएपीसाठी सामान्य प्रश्न

आपण व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गरजांसाठी प्रारंभ एलएपी घेऊ शकता. हे अशा कोणत्याही गोष्टीस मदत करू शकते ज्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण येवू शकतो आणि तसे होणार नाही याची ते खात्री करेल.

 • व्यवसायाचा विस्तार
 • खेळते भांडवल
 • आपल्या मुलाचे शिक्षण
 • आपल्या मुलाचा लग्नाचा खर्च
 • तत्काळ वैद्यकीय खर्च

प्रारंभ एलएपीची पात्रता आपल्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे आणि आपण जी मालमत्ता सुरक्षा / तारण म्हणून देणार असाल त्यावर आधारित आहे. ही रक्कम ₹ 3 लाख ते कमाल 15 लाखांपर्यंत आहे.

निवासी आणि व्यावसायिक दोन्ही मालमत्ता कर्जासाठी सुरक्षा म्हणून वापरली जाऊ शकतात. तथापि, मालमत्तेवर कोणतेही कर्ज चालू नसावे. औद्योगिक किंवा संस्थात्मक मालमत्ता सुरक्षा म्हणून वापरली जाऊ शकत नाही.

एलएपीसाठी आमचे पात्रता निकष खूपच लवचिक आहेत आणि आमच्याकडे पात्रतेचे 

खूपच सोपे निकष आहेत. आम्ही किमान दस्तऐवजीकरण आणि त्वरित परिणाम देखील सुनिश्चित करतो. आमच्या 135+ ICICI HFC शाखांपैकी प्रत्येक शाखेमध्ये, आपणास कायदेशीर आणि तांत्रिक तज्ञांची एक टीम भेटू शकते जे संपूर्ण प्रक्रियेसाठी आपले मार्गदर्शन करतील, एकावेळी एकेक पायरी पूर्ण करत, आणि आपल्याला शक्य तितक्या प्रत्येक मार्गाने मदत करेल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय नेहमीच उपलब्ध असला तरीही आमच्या शाखेतील तज्ञांचा सल्ला घेणे ही नेहमीच चांगला पर्याय आहे. आपण समोरासमोर बसू शकता आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.

आपला सह-अर्जदार आपला जोडीदार किंवा कुटुंबातील निकटचा सदस्य असू शकतो अगदी ते स्वत: कमावते नसतील तरीही. तथापि आपणास आपली गृह कर्जाची पात्रता वाढवायची असल्यास, आपण सह-अर्जदार जोडू शकता. जर आपली मालमत्ता दोन किंवा अधिक लोकांच्या मालकीची असेल तर हे आवश्यक आहे की सर्व सह-मालक आपल्या कर्जासाठी सह-अर्जदार आहेत.