पीएमएवाय योजनेचा आढावा

भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) नावाची योजना सुरू केली.

PMAY योजनेचा उद्देश 2020 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे आहे. आम्ही आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये केंद्र सरकारच्या 'सर्वांसाठी घरे' या अभियानाशी आणि पंतप्रधान आवास योजना (PMAY) मध्ये नमूद केलेल्या लाभांशी जोडलेले आहोत.

गृहनिर्माण व शहरी गरीबी निवारण मंत्रालयाने (MoHUPA) ने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) - सर्वांसाठी घरे, खरेदी / बांधकाम / विस्तार /भारतातील निवाऱ्याच्या गरजा भागविण्याकरिता EWS /LIG / MIG घटकातील लोकांना त्यांच्या घरांमध्ये सुधारणा करण्यासाठी नावाची व्याज अनुदान योजना सुरू केली आहे. 

आमचे होम लोन प्रॉडक्ट, अपना घर हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) विस्तारासाठी तयार केले गेले आहे, जे तुम्हाला ₹ 2.67 लाखापर्यंत अनुदानाचा लाभ देते. अर्जाच्या प्रक्रियेपासून ते पात्रतेच्या मानदंडापर्यंत, परतफेड पर्यायांपर्यंत आम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी तुमचे समर्थन करण्यास वचनबद्ध आहोत.

जर आपल्या स्वप्नातील घर आपल्याला अभिमानित समुदायांच्या पलीकडे, ग्रामपंचायती आणि नियमित वसाहतींच्या हद्दीत नसेल तरी आम्ही तुम्हाला मदत करू. तुमच्याकडे आयटीआर सारखे औपचारिक उत्पन्नाचे पुरावे नसतील तरीही आम्ही आपल्याला मदत करू. जर पूर्वी तुम्हाला गृहकर्ज मिळवणे कठीण झाले असेल किंवा तुम्हाला एखादे कर्ज मिळेल यावर खरोखरच विश्वास नसेल, तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ! आमच्या प्रत्येक 135+ आयसीआयसीआय एचएफसी शाखेत आपल्याला मैत्रीपूर्ण, मदत करणारे स्थानिक तज्ञ भेटतील, जे तुमचे स्वतःचे घर घेण्याविषयीचे मत बदलतील.

पीएमएवायचे फायदे

PMAY अंतर्गत सीएलएसएस होम लोनला परवडणारे बनवितो कारण व्याजाच्या भागावरील अनुदानामुळे गृह कर्जावरील आउटफ्लो / ओघ कमी होतो. या योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम मुख्यत्वे आपल्या उत्पन्नाच्या श्रेणीवर तसेच मालमत्ता युनिटच्या आकारानुसार आकारली जाते.

आपण PMAY साठी कधी अर्ज करू शकता?

ही योजना तीन टप्प्यात राबविली जात असून पहिल्या दोन टप्पे संपुष्टात आलेले आहेत. सध्या, शेवटचा टप्पा सुरू आहे; त्याची सुरुवात 1 एप्रिल 2019 रोजी झाली आहे आणि तो 31 मार्च 2022 रोजी संपेल.

म्हणून जर तुम्हाला PMAYचा लाभ घ्यायचा असेल तर आताच ती वेळ आहे.

मिळकत गट (PMAY उद्देशाने)
 • इडब्ल्यूएस/एलआयजी योजना- हे अभियान जून 17, 2015 पासून प्रभावी होते आणि मार्च 31, 2022 पर्यंत वैध आहे.
 • एमआयजी-1 आणि एमआयजी II योजना - हे अभियान मार्च 31, 2020 पासून प्रभावी होते आणि पुढील मुदत वाढीच्या अधीन मार्च 31, 2021 पर्यंत वैध आहे

लाभार्थी कुटुंबाची व्याख्याः पती, पत्नी, अविवाहित मुले आणि / किंवा अविवाहित मुली. (वैवाहिक स्थितीची पर्वा न करता कमावत्या प्रौढ सदस्याला MIG प्रकारात स्वतंत्र घर म्हणून मानले जाऊ शकते)

इतर शर्ती
 • उत्पन्नाशिवाय, आणखी एक महत्त्वाची अट आहे: लाभार्थी कुटुंबाकडे त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या/ तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारताच्या कोणत्याही भागामध्ये पक्के घर नसले पाहिजे;
 • महिला मालकी / सह-मालकी- EWS / LIGसाठीः केवळ नवीन खरेदीसाठी महिलांच्या मालकीची अनिवार्य आहे तर विद्यमान जमीनीवरील नवीन बांधकाम किंवा विद्यमान घराच्या वाढीव कामासाठी / दुरुस्तीसाठी अनिवार्य नाही. MIG -1 आणि MIG -II साठी: अनिवार्य नाही
 • जर आपण विवाहित असाल आणि PMAY फायद्याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही किंवा तुमचा जोडीदार किंवा संयुक्तपणे अर्ज करू शकता;
 • एक जोडपे म्हणून आपले उत्पन्न एक युनिट मानले जाईल; तथापि, जर कुटुंबात आणखी एखादा प्रौढ कमावता सदस्य असेल तर तो / ती त्याच्या/तिच्या वैवाहिक स्थितीची पर्वा न करता स्वतंत्र घर म्हणून मानली जाऊ शकते;
 • घर खरेदी / बांधकामासाठी आपण इतर कोणत्याही केंद्र सरकारची मदत घेतलेली नसावी;
 • आपल्या एकूण कौटुंबिक उत्पन्नाबद्दल आणि इच्छित मालमत्तेच्या मालकी बद्दल आपल्याला स्वत: चे घोषणापत्र आपल्या कर्ज प्रदात्यास द्यावे लागेल
 • PMAY अंतर्गत सर्व कर्ज खाती आपल्या आधार कार्डशी जोडलेली असणे आवश्यक आहे

पीएमएवाय योजनेतील पात्रता

प्रथम, मालमत्ता स्वतः:

 • अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपण निवडलेली निवासी मालमत्ता एकल युनिट किंवा कोणत्याही बहुमजली इमारतीतील युनिट असणे आवश्यक आहे.
 • पात्र युनिटमध्ये शौचालय, पाणी, मलनिःसारण, रस्ता, वीज इत्यादी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे;

दुसरे म्हणजे, कार्पेट एरिया / क्षेत्र (भिंती समाविष्ट नाही) यापेक्षा अधिक नसावे:

 • EWS - 30 चौरस मीटर (323 चौरस फूट)
 • LIG - 60 चौरस मीटर (646 चौरस फूट)
 • MIG -I - 160 चौरस मीटर (1722 चौरस फूट)
 • MIG- II - 200 चौरस मीटर (2153 चौरस फूट)/li>

अंतिमत:, स्थानः

 • जनगणना 2011 नुसार सर्व वैधानिक नगरे आणि त्यानंतर अधिसूचित केलेली नगरे, वैधानिक नगरासंदर्भात अधिसूचित केलेल्या नियोजन क्षेत्रासह.
 • जर आपणास आपले नगर पात्र आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या (NBH) लिंकवर क्लिक करा आणि “वैधानिक नगर व नियोजन क्षेत्र कोड” चिन्हांकित विभाग पहाः https://nhb.org.in/government-scheme/pradhan-mantri-awas-yojana-credit-linked-subsidy-scheme/

पीएमएवाय योजनेतील कर्जाची मर्यादा

 • EWS: रुपये 6 लाख;
 • LIG: रुपये 6 लाख;
 • MIG (I):रुपये 9 लाख;
 • MIG (II): रुपये 12 लाख
टीपः
निर्दिष्ट मर्यादेपलीकडील सर्व अतिरिक्त कर्ज, जर काही असतील तर विना अनुदानित दरावर प्रदान केले जातील.
व्याज अनुदानाचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) 9% सवलतीच्या दराने मोजले जाईल.

पीएमएवाय योजनेतील कर्जाचा कालावधी

चारही प्रकारांत असलेल्या कर्जाची मुदत 20 वर्षे आहे.

पीएमएवाय योजनेतील व्याजदर

 • EWS: 6.5%; रुपये 2.67 लाखांपर्यंत
 • LIG: 6.5%; रुपये 2.67 लाखांपर्यंत
 • MIG (I): 4%; रुपये 2.35 लाखांपर्यंत
 • MIG (II): 3%; रुपये 2.30 लाखांपर्यंत

पीएमएवाय योजनेसाठी कसे अप्लाय करावे.

18 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे कोणतेही कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकते. आपण PMAY अनुदानाच्या फायद्यासाठी अर्ज करू इच्छित असल्यास आपण आमच्या 135+ आयसीआयसीआय एचएफसी पैकी कोणत्याही शाखेमध्ये आपला अर्ज सबमिट करू शकता. आमचे स्थानिक शाखा तज्ञ घटनास्थळी लगेचच आपल्या विनंतीचे पुनरावलोकन करतील आणि हा दावा नॅशनल हाउसिंग बँकेकडे पाठवतील. आपल्यासाठी ही प्रक्रिया जलद आणि सोपी बनविणे हेच आमचे उद्दीष्ट आहे.

 1. सेल्फ डेक्लेरेशन / स्वत: चे घोषणापत्र फॉर्म डाउनलोड करा आणि भरा
 2. आपल्या जवळच्या आयसीआयसीआय एचएफसी शाखेमध्ये ते सबमिट करा
 3. कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्डे आणि आपला मूळ आयडी पुरावा सोबत घेवून या

* अनुदानाची आपली विनंती मंजुरीच्या अधीन आहे आणि सीएलएसएसचा लाभ घेण्याप्रति नॅशनल हाउसिंग बँकेकडून मिळणाऱ्या मंजुरीसाठी आपल्या पात्रतेचे मूल्यांकन करणे हे भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. येथील मजकूर हा योजनेत हक्कांचे मुल्यांकन करण्यासाठी नमूद केलेले मापदंड आहेत.

पीएमएवाय अनुदान कॅल्क्युलेटर

तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहात की नाही आणि आमच्या पीएमएवाय अनुदान कॅल्क्युलेटरसह तुम्ही किती अनुदान मिळवू शकता हे शोधा.

तुम्ही कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय मदत घेतली आहे का किंवा PMAY अंतर्गत कोणतेही लाभ घेतले आहेत का?
हे तुमचे पहिले पक्के घर आहे का?
एकूण कौटुंबिक उत्पन्न प्रविष्ट करा
Thirty Thousand
कर्जाची रक्कम
Ten Lakhs
कर्ज कालावधी (महिने) प्रविष्ट करा
8 year's and 1 month
महिने

PMAY Subsidy Amount

0


अनुदान वर्ग

EWS/LIG

EMI मधील निव्वळ कपात

निव्वळ कपात मूल्य

खाली तपशील भरा

कृपया आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा
कृपया आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा
कृपया कर्ज रक्कम प्रविष्ट करा
कृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा
आपले शहर निवडा
कृपया अटी व शर्ती मान्य करा

PMAY वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आर्थिक दुर्बल विभाग (EWS) / लोअर इनकम ग्रुप (LIG) / मध्यम उत्पन्न गट (MIG) अशा गटांसाठी गृह कर्जावरील व्याज अनुदानाच्या स्वरूपात, ICICI होम फायनान्स सारख्या योजनेची अंमलबजावणी संस्थाद्वारे PMAY केंद्रीय सहाय्य पुरविते. योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2015-2022 आहे.

पात्रता अटी

योजनेचा प्रकार

EWS

LIG

MIG – I

MIG – II

पात्रता आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न

रुपये 0 ते रुपये 3 लाख

रुपये 3 लाख ते रुपये 6 लाख

रुपये 6 लाख ते रुपये 12 लाख

रुपये 12 लाख ते रुपये 18 लाख

चटई क्षेत्र - कमाल (चौरस मीटर)

30*

60*

160

200

अनुदानासाठी पात्र कमाल कर्ज रक्कम

रुपये 6 लाख

रुपये 6 लाख

रुपये 9 लाख

रुपये 12 लाख

व्याजावरील अनुदान

6.50%

6.50%

4.00%

3.00%

अनुदानाची कमाल पात्र रक्कम

रुपये 2.67 लाख

रुपये 2.67 लाख

रुपये 2.35 लाख

रुपये 2.30 लाख

कर्जाची कमाल मुदत ज्यावर अनुदानाची गणना केली जाईल

15 वर्षे

15 वर्षे

20 वर्षे

20 वर्षे

योजनेचा कालावधी

31 मार्च 2022 पर्यंत 

31 मार्च 2022 पर्यंत 

31 मार्च 2021 पर्यंत 

31 मार्च 2021 पर्यंत 

स्रियांची मालकी

बंधनकारक #

बंधनकारक #

बंधनकारक नसलेले

बंधनकारक नसलेले

* दुरुस्ती व नूतनीकरणाच्या बाबतीत लागू

#बांधकाम / विस्तारासाठी स्त्री मालकी अनिवार्य नाही

इतर अटीः

 •        लाभार्थी कुटुंबाने त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या / तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने भारताच्या कोणत्याही भागात पक्के घर असू नये.
 •        विवाहित जोडप्याच्या बाबतीत, दोघांपैकी एकजण किंवा दोघेही एकत्र (संयुक्त मालकीचे) एकाच अनुदानास पात्र ठरतील
 •         लाभार्थी कुटुंबाने भारत सरकार कडून इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत केंद्रीय सहाय्य किंवा PMAY मधील कोणत्याही योजनेत कोणताही लाभ घेतलेला असू नये.

आपण 3 सुलभ चरणांमध्ये आपली PMAY अर्ज स्थितीचा मागोवा ऑनलाइन सहज घेऊ शकता:

i. PMAY योजना वेबसाइटवर लॉग ऑन करा: https://pmaymis.gov.in/track_application_status.aspx

ii. अर्ज स्थितीचा मागोवा घेण्यासाठी खालील पर्यायांपैकी एक निवडा:

  a. नावाने, वडिलांचे नाव आणि मोबाइल क्रमांक’

  किंवा

    b. मूल्यांकन आयडी

आता फक्त हे तपशील इनपुट करा आणि सबमिट वर क्लिक करा. आपली अर्ज स्थिती आपल्या स्क्रीनवर दर्शविली जाईल

PMAY अंतर्गत आपल्याला मिळणारा अनुदान लाभ आपण कोणत्या विभागामध्ये बसत आहात यावर अवलंबून असेल- आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS), लोअर इन्कम ग्रुप (LIG), किंवा मध्यम उत्पन्न गट (MIG[RJ/1]).

 

EWS

LIG

MIG - I

MIG – II

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न

रुपये 0 ते रुपये 3 लाख

रुपये 3 लाख ते रुपये 6 लाख

रुपये 6 लाख ते रुपये 12 लाख

रुपये 12 लाख ते रुपये 18 लाख

 

आपण पंतप्रधान आवास योजनेसाठी (PMAY) पात्र आहात की नाही आणि आपल्याला या योजनेंतर्गत किती अनुदान मिळू शकेल हे आमच्या PMAY सबसिडी कॅल्क्युलेटरद्वारे शोधू शकता.

आपण लहान किराणा दुकान चालवित असाल किंवा आपण कुठेतरी नोकरी करत आहात, आपल्या स्वप्नांतील घरामध्ये राहणे हा आपला मूलभूत हक्क आहे. गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाने (MoHUPA) 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना शहरी भागातील सर्वांसाठी घरे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू केली.

आपण नवीन घर खरेदी करू इच्छित असल्यास रीसेलचे घर खरेदी करू इच्छित असल्यास PMAY फायदे मिळू शकतात. आपण ICICI होम फायनान्स सारख्या अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीमार्फत घराच्या बांधकामासाठी कर्ज घेऊ शकता. आपण या योजने अंतर्गत ‘कच्चा’ घराला ‘पक्क्या’ घरात सुधारित करू शकता. या योजनेद्वारे देण्यात येणारा व्याज अनुदान दर हा 20 वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज घेणार्‍या सर्व लाभार्थ्यांसाठी 6.5% पर्यंत आहे.

 

आपण आपल्या PMAY अर्ज स्थितीचा मागोवा ऑनलाइन सहज घेवू शकता. फक्त भेट द्या: https://pmaymis.gov.in/track_application_status.aspx

PMAY अंतर्गत तुम्ही 20 वर्षांत कर्जाची परतफेड करू शकता तर EWS आणि LIG वर्गासाठी अनुदान कमाल 15 वर्षे मुदतीसाठी मिळू शकेल. MIG योजनांसाठी हेच 20 वर्षे आहे.

PMAY मधील क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) हा घटक वेतन आणि स्वयंरोजगार अर्जदाराद्वारे घेतलेल्या गृह कर्जावर व्याज अनुदान देते, जे अर्जदार या अंतर्गत आहेत:

 • EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग)
 • LIG (कमी उत्पन्न गट)
 • MIG - I (मध्यम उत्पन्न गट 1)
 • MIG - II (मध्यम उत्पन्न गट 2)

EWS / LIG प्रवर्गातील व्यक्तींना रुपये 6 लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर 6.5% व्याज अनुदान मिळेल. MIG - I श्रेणीतील व्यक्तींना रुपये 9 लाखापर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर 4 % व्याज अनुदान मिळेल तर MIG -II वर्गातील व्यक्तींना रुपये 12 लाखापर्यंतच्या कर्जावर 3% अनुदान मिळेल. ICICI HFC अपना घर गृह कर्जासह, आपल्याला आवश्यक असल्यास विना अनुदान दरावर अतिरिक्त कर्ज देखील घेऊ शकता.

PMAY - CLSS अंतर्गत, सर्व श्रेणीसाठी घराचे क्षेत्रफळ भिन्न आहे. CLSS अंतर्गत व्याज अनुदानासाठी पात्र घरांचे चटई क्षेत्र (घराच्या भिंतींमधील जागा अंतर्गत भिंतींची जाडी वगळता) खालीलप्रमाणे आहे:

 •        EWS - 30 चौरस मीटर (अंदाजे 323 चौरस फूट)
 •        LIG - 60 चौरस मीटर (अंदाजे 646 चौरस फूट)
 •        MIG - I - 160 चौरस मीटर (अंदाजे 1722 चौरस फूट)
 •        MIG - II - 200 चौरस मीटर (अंदाजे 2153 चौरस फूट)